Ladki Bahin Yojna KYC Update 2026: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते खात्यात जमा न झाल्याने अनेक महिला चिंतेत आहेत. e-KYC करूनही महिलांना ‘अपात्र’ का ठरवण्यात आले, याचे धक्कादायक तांत्रिक कारण आता समोर आले आहे.
का रखडले २४ ते २५ लाख महिलांचे पैसे?
राज्यातील सुमारे २४ लाख महिलांना अद्याप डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. e-KYC अर्जातील एका विशिष्ट प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने हा मोठा गोंधळ उडाला आहे.
- तो गोंधळात टाकणारा प्रश्न: अर्जात विचारले होते, “तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत नाही ना?”
- महिलांची चूक: ग्रामीण भागातील अनेक महिलांनी “हो, आमच्या घरी कोणीही सरकारी नोकरीला नाही” अशा अर्थाने ‘हो’ पर्यायावर टिक केले.
- सिस्टीमचा अर्थ: संगणकीय प्रणालीनुसार (System), ‘हो’ चा अर्थ असा झाला की “हो, माझ्या घरात सरकारी कर्मचारी आहे.” यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्या महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या.
सरकारचा तोडगा: अंगणवाडी सेविकांकडून ‘प्रत्यक्ष पडताळणी’
महिलांची ही तांत्रिक चूक लक्षात घेऊन सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता महिलांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, तर सरकार स्वतः तुमची पडताळणी करणार आहे.
- घरोघरी भेट: ज्या महिलांचे पैसे या एका प्रश्नामुळे रखडले आहेत, त्यांच्या घरी आता अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष भेटी देतील.
- खात्री पटवणे: तुमच्या घरात खरोखरच कोणी सरकारी नोकरीत आहे का, याची प्रत्यक्ष माहिती घेतली जाईल.
- अहवाल: अंगणवाडी सेविकांनी सकारात्मक अहवाल दिल्यानंतर, सिस्टीममध्ये बदल करून तुम्हाला पुन्हा ‘पात्र’ ठरवले जाईल.
पडताळणीवेळी महिलांनी काय करावे?
- सहकार्य करा: अंगणवाडी सेविका जेव्हा तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती द्या.
- कागदपत्रे: आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत ठेवा, जेणेकरून विचारल्यास पडताळणी सोपी होईल.
- थकीत पैसे: पडताळणी यशस्वी झाल्यावर तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि चालू जानेवारी महिन्याचे मिळून एकत्रित ४,५०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.