लाडकी बहिण योजना: महिलांची पुन्हा पडताळणी सुरू! या महिलांना एकत्र इतके पैसे Ladaki Bahin Yojana Varification 2026

Ladaki Bahin Yojana Varification 2026: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करूनही त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळाले नव्हते. या तांत्रिक अडचणीवर आता महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाचा तोडगा काढला असून ट्विटरच्या माध्यमातून मोठी घोषणा केली आहे.

नेमकी अडचण काय होती?

ई-केवायसी करण्याची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०२५ होती. मात्र, ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा ई-केवायसी करताना तांत्रिक कारणामुळे अनेक महिलांकडून चुकीचा पर्याय (Wrong Option) निवडला गेला. यामुळे पात्र असूनही सिस्टीममध्ये त्रुटी दिसू लागल्या आणि लाखो भगिनींचे नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते रखडले.

आता सरकारचा नवीन ‘पर्यायी मार्ग’: प्रत्यक्ष पडताळणी

कोणत्याही पात्र महिलेवर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने आता फिजिकल व्हेरिफिकेशन (प्रत्यक्ष पडताळणी) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

  • अंगणवाडी सेविका तुमच्या दारी: आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुमच्या गावातील किंवा प्रभागातील अंगणवाडी सेविका स्वतः तुमच्या घरी येऊन तुमची भेट घेतील.
  • घरी येऊन तपासणी: अंगणवाडी सेविकांकडे असलेल्या रजिस्टर किंवा टॅबमध्ये तुमची माहिती प्रत्यक्षरित्या तपासली जाईल.
  • पारदर्शक प्रक्रिया: ऑनलाईन प्रक्रियेत अनेकदा गरजू महिलांचे हप्ते थांबले होते, तर काही सधन महिला लाभ घेत होत्या. आता प्रत्यक्ष भेटीमुळे खऱ्या पात्र महिलांना प्राधान्याने लाभ दिला जाईल.

पडताळणी प्रक्रियेचे ४ महत्त्वाचे टप्पे:

१. त्रुटी शोधणे: ई-केवायसी मध्ये झालेल्या तांत्रिक चुकांची यादी तयार करणे. २. अंगणवाडी सेविकांची भेट: क्षेत्रीय स्तरावर सेविका लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन त्यांची माहिती घेतील. ३. पात्रता तपासणी: कुटुंबाचे उत्पन्न, सरकारी नोकरी, इन्कम टॅक्स किंवा घरात चारचाकी गाडी यांसारख्या निकषांची प्रत्यक्ष पाहणी होईल. ४. लाभ निश्चिती: सेविकांच्या अहवालानंतर तुमचे स्टेटस पुन्हा ‘पात्र’ केले जाईल आणि रखडलेले सर्व हप्ते एकत्रित वितरित केले जातील.

जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासकीय आदेश

या प्रक्रियेबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. “कोणतीही पात्र बहीण वंचित राहणार नाही,” असा संकल्प सरकारने केला आहे. त्यामुळे ज्या महिलांचे पैसे रखडले आहेत, त्यांनी काळजी करू नका; अंगणवाडी सेविकांच्या भेटीनंतर तुमचे सर्व प्रश्न सुटणार आहेत.

Leave a Comment