Ladaki Bahin Yojana KYC Process 2026: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते विनाअडथळा मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक महिलांनी केवायसी केली आहे, पण ती सिस्टीममध्ये अपडेट झाली आहे की नाही, हे तपासणे गरजेचे आहे. जर तुमची केवायसी अपूर्ण राहिली, तर तुमचे पैसे थांबण्याची शक्यता आहे.
तुमच्या ई-केवायसीची स्थिती कशी तपासायची, याची Step-by-Step माहिती खालीलप्रमाणे आहे:
ई-केवायसी स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
१. ब्राउझर ओपन करा: तुमच्या मोबाईलमधील Chrome ब्राउझरवर जाऊन ‘लाडकी बहीण योजना ई-केवायसी’ असे सर्च करा.
२. अधिकृत वेबसाईट: पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या अधिकृत ऑप्शनवर क्लिक करा.
३. केवायसी लिंक: होमपेजवर तुम्हाला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
४. आधार आणि कॅप्चा: आता तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाका आणि तिथे दिसणारा कॅप्चा कोड अचूक भरा. (कॅप्चा कोड दिसत नसेल तर रिफ्रेश बटण दाबा).
५. ओटीपी आणि संमती: ‘मी सहमत आहे’ या पर्यायावर टिक करा आणि ‘ओटीपी पाठवा’ (Send OTP) या बटणावर क्लिक करा.
निकाल कसा समजेल?
- केवायसी पूर्ण असल्यास: जसे तुम्ही ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक कराल, तसे स्क्रीनवर एक वार्निंग मेसेज येईल: “या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे”. असा मेसेज आला तर समजून जा की तुमची केवायसी झालेली आहे आणि तुम्हाला आता काहीही करण्याची गरज नाही.
- केवायसी अपूर्ण असल्यास: जर मेसेज येण्याऐवजी तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला, तर याचा अर्थ तुमची केवायसी अद्याप झालेली नाही. अशा वेळी तो ओटीपी टाकून केवायसी प्रक्रिया लगेच पूर्ण करा.
ई-केवायसी का गरजेची आहे?
- पुढील हप्ते (उदा. ₹३००० किंवा ₹१५०० चा हप्ता) जमा होण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे.
- तांत्रिक अडचणींमुळे ज्यांचे पैसे रखडले आहेत, त्यांना केवायसीमुळे दिलासा मिळेल.
- जर स्वतःच्या आधारने केवायसी होत नसेल, तर कुटुंबातील इतर सदस्याचा (पती किंवा वडील) आधार जोडून प्रक्रिया पूर्ण करण्याचे पर्यायही वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
महत्त्वाची टीप: ज्या महिलांची केवायसी अजूनही झालेली नाही, त्यांनी त्वरित ती पूर्ण करून घ्यावी. केवायसी कशी करायची याचा सविस्तर ‘लाईव्ह डेमो’ व्हिडिओ आमच्या चॅनेलवर उपलब्ध आहे, तो नक्की पहा.
तुम्ही तुमची ई-केवायसी चेक केली का? तुम्हाला ‘पूर्ण झाली’ असा मेसेज आला का, कमेंटमध्ये नक्की सांगा! ही माहिती तुमच्या परिसरातील इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा.